रात्रचं ती देखणी होती चांदण्यात उभी सजणी होती भिरभीर वारा कुठूनसा आला मनात काहूर उठवून गेला आज ती आठवते मनात एक आठवण असते तिचा तो मुखडा जणू चंद्राचाच गोजिरवाणा तुकडा काळजात ती अन फक्त तीच असते स्वप्नात ती येते अनं विचारते हळूच, "माझी आठवण येते का रे अजून " आणि मी म्हणतो, "आठवण फक्त त्यांचीच, ज्याना विसरलो होतो" तू तर माझे जीवन व्यापून आहेस मी कधी तुझ्याजवळ येऊ शकलो नाही म्हणून काय झालं ? तुला कधी माझं प्रेम समजावू शकलो नाही म्हणून काय झालं? तू फक्त तूच होतीस अनं माझे विश्व व्यापून होतीस माझ्या हृदयाची एकमेव सम्राज्ञीच तू होतीस तुझं बोलणं, नखरेल हसणं निळ्या डोळ्यांनी खट्याळपणे पाहणं सारचं विलोभनीय होतं मला दिवानं केलं होतं तुझ्या अदांनी तुला खळखळून हसताना पाहिलं की हिर्यामोत्यांची बरसात झाल्यासारखं वाटायचं..., .... वाटायचं हि तर स्वर्गाची अप्सरा, या पृथ्वीवर कशी काय आली? बहुतेक काही तरी चूकचं केली विधात्यानं, तुझं सौंदर्य खरचं दैवी होतं, केवल दैवी... तुझ्यासारख्या भाग्यवंतांनाच ते लाभतं नव्हे तूच केवळ एकमेव भाग्यवंत होतीस...... ... आज... या क्षणी कुठे असशील? काय करत असशील? मात्र आज हि वाटतं आजही तू तशीच असशील...
सहेतुक नजरेने जेव्हा तिने पाहिले हृदयाचे त्याच्या तिथेच पाणी पाणी झाले ॥२॥
गुलाबाच्या धुंद सुवासाने मोहरली दोघांची मने या प्रेमाला साक्ष होती गुलमोहराची वने ॥३॥
पण या प्रेमाला दॄष्ट कुणाची लागली त्याला कऴे ना ही अशी का वागली ॥४॥
मात्र त्याला माहित होते तोंडावरती म्हणते 'नालायक नीच' शब्द धरले अड़वून पुढचे"मनात मात्र ' मीच ' " ॥५॥
माझी भरतभूमी
पवित्र देश ,भारत देश तूच रे भाग्यशाली तुझ्या सुपुत्रांनी रेखिली प्राक्तन रेषा तुझ्या भाळी दुशाचे वाहती धबधबे हिरवे हिरवे तृणांचे पसरून गालिचे करी स्वागत अभ्यागताचे रक्षणार्थ खंबीर हा हिमालय अन हिशीखारे करी समृद्ध ही भरतभूमी अडवून उत्तरेचे वारे तट लाभे तुलाच मोठा देई व्यापार संधी मोठी देशोसेधीचे राजवाडे येथ माथे तव चरणी टेकती जवान ही ते धन्य थोर प्राण करती देशार्पण जगतावर राज्य करण्या तुझी रे ही निर्मिती रूप तुझे हे सुंदर इतके अन हवीहवीशी माती सृष्टीकर्ताही तुज पाहुनी पुनःपुन्हा जन्म इथे घेती तुझे सुपुत्र नाहीत मागे करतील अग्रेसर तुजला नसेल कुणाला पण ही खात्री आहे मजला