Sunday, October 11, 2009

त्या सोनेरी क्षणी...

प्रेयसीला थरथरणार्‍या हाताने गुलाबाचे फुल देणारा प्रियकर
जेव्हा तिला सांगतो की,'माझ तुझ्यावर प्रेम आहे'...
त्यावेळी सर्व जग त्यांच्यासाठी थांबतं..क्षणभर थबकतं,
तिचा होकार ऐकण्यासाठी उत्सुकतेने कान टवकारतं
आणि तिच्या त्या लाजून लाल झालेल्या
गालांना लपवत ती होकार देते,
त्या सोनेरी क्षणी....
तेही गालातल्या गालात हसतं,
प्रियकराच्या आनंदात सामील होतं
हळूच स्वतःच्याही भूतकाळात हरवतं
कुणीतरी आपल्या साठी आहे...अन
आपण कुणासाठी तरी आहोत...
ही भावनाच फार सुंदर आहे...
खोटं वाटतं तर ,
समुद्राकडे धाव घेणार्‍या नदीला विचारा
ढगातून थेट जमिनी कडे स्वतःला
झोकून देणार्‍या जलबिंदूंना विचारा
अगदीच नाही तर सूर्याला फक्त बघण्यासाठी
मान वेळावणार्‍या सूर्यफुलाला विचारा
कुणीही कुणावरही प्रेम करू नका...
पण जेव्हा कराल आवेगाने प्रेम करा
बेधुंद प्रेम करा

चार पावलं

चार पावलं आपण,सोबत चालत जाऊ
तुझे आणि माझे सूर,कुठवर जुळतात पाहू

अर्थात,जमत असेल तर चल,मी आग्रह करणार नाही
'आज तरी तुला यावंच लागेल',असा हट्टही धरणार नाही

पण मनातल्या मनात कुढण्यापेक्षा,व्यक्त करणं बरं असतं
कारण इथून तिथून ऐकलेलं,सारंच काही खरं नसतं

कुणी कुणाला का आवडावं,हे सांगता येत नाही
चारचौघांना विचारून कुणी,हृदय देत नाही

तसंच काहीसं माझं झालं,त्याच धुंदीत प्रपोज केलं,
जवळ अशी कधी नव्हतीसचं...प्रपोजनं आणखी दूर नेलं

दुरावलीस हे वाईट झालं,पण झालं ते बरंच झालं
खरं सांगणं गुन्हा असतो,एवढं मात्र लक्षात आलं

जाऊ दे...झालं गेलं विसरून जा,मागे न पाहता चालत रहा
मला विसर अस मी म्हणणार नाही,पण तू तो प्रयत्न करून पहा.....

...थांब....इथून पुढे मला,एकट्यालाच जायचयं,
पण धन्यवाद,तू इथवर आलीस....

सारं आयुष्य नसलीस,तरी
चार पावलं माझी झालीस...
चार पावलं माझी झालीस......

Sunday, October 4, 2009

सोबत...काही क्षणांची

चांदणी रात्र होती
चंद्रही सोबतीला...

शुभ्र हिमाची बरसात होती
वारा ही सोबतीला...

दर्याची हाक होती
दर्यासारंग सोबतीला...

मनात एक बात होती
एकांत सोबतीला...

स्वप्नांची फुलबाग होती
दाहक वास्तव सोबतीला...

तरुणाईच्या दोन कळ्या होत्या
समाजाच्या पापी नजरा सोबतीला...


हृदयात एक तूच होतीस
विरह दुखः सोबतीला...

प्रेमाची तहान होती
कुणीच नव्हते सोबतीला...
कुणीच नव्हते सोबतीला....
कुणीच नव्हते सोबतीला.....

!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H

मधुरा

चंद्र उभा आकाशी
चांदणे शिंपीत हळूहळू
गार गार वारा
सुटला होता आपल्याच धुंदीत
शीतल चंद्राचे चांदणे
हवेत पसरवित
अलगद एक परी नभीची
आली या चंद्राजवळ
जादू तिची त्याला लाभली
कारण स्वागता तिची त्याने केली
दोघांचा सुखाचा संसार
रात्रभर चालला
पहाटे ती म्हणाली
जाते मी आता
परतून येईन पुन्हा
वळून पाही ती चंद्राला जाताजाता
चंद्र ही मग हसला
तिला पाहून पुनः फसला
भुलून तो क्षणभर थांबला
इतक्यात पूर्वेकडून सूर्य आला
सुर्याने मग चंद्रास पाहिले
जरासे दूर पाठमोर्या वहिनीस पाहिले
कौतुकाने हसून म्हणाला
"जा तू आता आपल्या घरी
देतो मी दिवसभर पहारा पृथ्वीच्या दारी"
संपली ती रात्र !
संपली ती रात्र !!
चंद्र आणि परीची मधुर रात्र !!!






!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H

एक प्रेमपत्र - फ़क्त तिच्याचसाठी


पौर्णिमेच्या दिवशी
जशी समुद्रल भरती येते
तशीच खळबळ आज
माझ्या मनात आहे....
त्याला कारण ही तूच!
चंद्राहून अधिक सौन्दर्य
आज तुझ्यात सामावलेलं आहे....
म्हणूनच आज मी,
तुला सांगायचं धाडस करतो की,
माझं तुझ्यावर प्रेम आहे...
तुझा होकार ऐकण्यासाठी...
आज धुंद झाल्यात दिशा
निशब्द झाले आज वारा
तुझ्या एक होकारात
माझा स्वर्ग सामावलाय
तुझा वेडा प्रेमी तुला प्रेमाची साद घालतोय
तुझ्या एक होकाराची वाट पाहतोय

!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!H!!

Wednesday, November 7, 2007